Animal Box Office Collection Day 15 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमागृहात या सिनेमाला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. लवकरच हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे.


'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection)


सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी, आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 36 कोटी, अकराव्या दिवशी 13.85 कोटी, बाराव्या दिवशी 12.72 कोटी, तेराव्या दिवशी 10.25 कोटी, चौदाव्या दिवशी 8.75 कोटी आणि पंधराव्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली आहे.


पहिला दिवस : 63.8 कोटी
दुसरा दिवस : 66.27 कोटी
तिसरा दिवस : 71.46 कोटी
चौथा दिवस : 43.96 कोटी
पाचवा दिवस : 37.47 कोटी
सहावा दिवस : 30.39 कोटी
सातवा दिवस : 24.23 कोटी
आठवा दिवस : 22.95 कोटी
नववा दिवस : 34.74 कोटी
दहावा दिवस : 36 कोटी
अकरावा दिवस : 13.85 कोटी
बारावा दिवस : 12.72 कोटी
तेरावा दिवस : 10.25 कोटी
चौदावा दिवस : 8.75 कोटी
पंधरावा दिवस : 7.50 कोटी
एकूण कमाई : 484.34 कोटी


'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा यांनी सांभाळली आहे. 'अॅनिमल' हा अॅक्शन क्राइम सिनेमा आहे. वडिल-मुलांच्या टॉक्सिक रिलेशनशिपवर आधारित हा सिनेमा आहे. 'अॅनिमल' या सिनेमात रणबीर कपूरने आपल्या अॅक्शनने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. या सिनेमात अनिल कपूरने (Anil Kapoor) रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदाना आणि तृप्ति डिमरीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 






'अॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज? (Animal OTT Release)


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' हा सिनेमा 2024 च्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने 'अॅनिमल'चे ओटीटी राईट्स विकत घेतले असल्याची चर्चा आहे. थिएटरमध्ये न दाखवलेले सीन ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"रणबीर कपूर तुमच्या डोळ्यात पाहत आहे. हीच पोस्ट आहे..तुमचं स्वागत".


संबंधित बातम्या


Animal OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवणारा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल