Animal Box Office Collection Day 12 : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'अॅनिमल' या सिनेमाला रिलीज होऊन 12 दिवस पूर्ण झाले आहेत. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाची क्रेझ आजही कमी आहे. एकीकडे या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे मात्र रिलीजच्या 12 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण पाहायाला मिळाली आहे.


'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. देशभरातील सिनेप्रेमी मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत. रणबीरच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत आहे. रिलीजच्या 12 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. 


'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection Day 12)


'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. ओपनिंग डेला या सिनेमाने 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी, सातव्या दिवशी 24.23 कोटी, आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 36 कोटी, अकराव्या दिवशी 13.85 कोटी आणि बाराव्या दिवशी 13 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत 'अॅनिमल' या सिनेमाने आतापर्यंत 458.12 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 737.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता हा सिनेमा जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार करेल का याकडे सर्वांचंं लक्ष लागलं आहे.


'अॅनिमल'ने 12 व्या दिवशी मोडला आमिर-सनीचा रेकॉर्ड


'अॅनिमल' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. आता रिलीजच्या 12 व्या दिवशी 13 कोटींची कमाई करत या सिनेमाने सनी देओलचा 'गदर 2' आणि आमिर खानचा 'दंगल' या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'गदर 2' या सिनेमाने रिलीजच्या 12 व्या दिवशी 12.1 कोटींची कमाई केली होती. तर दंगल या सिनेमाने 9.81 कोटींचं कलेक्शन जमवलं होतं. 


'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी सांभाळली आहे. तर या सिनेमात रणबीर आणि रश्मिकासह बॉबी देओल आणि अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होऊ शकतो.


संबंधित बातम्या


Ranbir Kapoor Networth : कोट्यवधींचा मालक आहे आलियाचा नवरा; चित्रपटांव्यतिरिक्त रणबीरची कमाई काय?