Rajinikanth: अभिनेता  रजनीकांत (Rajinikanth)  यांचा आज  73 वा वाढदिवस  आहे. अनेक सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी रजनीकांत यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त  लाइका प्रोडक्शननं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून Thalaivar 170 च्या टायटलची घोषणा करण्यात आली आहे.


काय आहे चित्रपटाचं नाव? (Vettaiyan Titled Teaser out)


Thalaivar 170 म्हणजेच रजनीकांत यांच्या 170 व्या चित्रपटाच्या टायटलची आज घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव  वेट्टैयन असं आहे. नुकताच  लाइका प्रोडक्शननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी  वेट्टैयन या चित्रपटाची घोषणा केली आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांचा स्वॅग दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रजनीकांत हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्यानंतर  डोळ्यावर गॉगल आणि हातात काठी अशा लूकमध्ये दिसत आहेत. 


पाहा व्हिडीओ:



लाइका प्रोडक्शननं ट्वीटमध्ये देखील  Thalaivar 170 च्या टायटलची माहिती दिली आहे. त्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,  "प्रतीक्षा संपली! Thalaivar170 चे  टायटल सादर करत आहोत- वेट्टैयन. थलाइवारची शक्ती, शैली आणि स्वैग त्यांच्या खास दिवशी दाखवत आहोत!"






अमिताभ बच्चन आणि रजनीकांत 33 वर्षानंतर शेअर करणार स्क्रीन


वेट्टैयन या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे 33 वर्षानंतर स्क्रीन शेअर करणार आहेत.  अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 1991 मध्ये रिलीज झालेल्या  'हम' या चित्रपटात एकत्र काम केले होते.  त्यानंतर आता ते वेट्टैयन या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात  फहद फासिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर, किशोर, रितिका सिंह, दुशारा विजयन, जीएम सुंदर, रोहिणी, राव रमेश, रमेश थिलक, रक्षा हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन टी.जे. ज्ञानवेल यांनी केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Amitabh Bachchan And Rajinikanth:  दोन सुपरस्टार एकाच फ्रेममध्ये! रजनीकांत यांनी शेअर केला बिग बींसोबतचा फोटो; म्हणाले, "33 वर्षांनंतर मी..."