Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज आपला 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. बिग बी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता बिग बी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टींचा लिलाव करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'या' गोष्टींचा झाला लिवाव (Amitabh Bachchan These Things Auctioned)
अमिताभ बच्चन यांचा 'शोले' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. रिपोर्टनुसार,या सिनेमाचं पोस्टर असलेल्या टाल्कम पावडरच्या डब्याचा लिलाव झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या निवडणूक प्रचाराच्या ओळखपत्रावर बोली लावण्यात आली. हे ओळखपत्र तब्बल 67 हजार रुपयांत विकले गेले. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि मुहम्मद अली (Muhammad Ali) यांच्या फोटोचाही लिलाव झाला आहे.
अमिताभ बच्चन, अजिताभ बच्चन आणि हरिवंश राय बच्चन यांचा फोटोही लिलावात होता. बिग बी यांनी 'जंजीर','दीवार','राम बलराम','जमीर' आणि 'शोले' अशा सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. या सिनेमांच्या शोकार्डचाही लिलाव करण्यात आला आहे. तब्बल 50 हजार रुपयांत हे कार्ड विकले गेले आहेत.
अमिताभ बच्चन यांचा 'कल्कि 2898 AD' आणि 'गणपत' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'गणपत' या सिनेमात बिग बी टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला असून बिग बींची झलक पाहायला मिळाली आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस खास...
अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस खूपच खास आहे. कुटुंबीय आणि चाहत्यासोबत त्यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे. रात्री बारा वाजता जया बच्चन, नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा आणि आराध्या बच्चन यांनी बिग बींचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर 'जलसा' बाहेर येत त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावरही खास पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला होता. त्यात बिग बी म्हणत होते,"आणखी किती रडवणार आहात".
संबंधित बातम्या