Luv Ranjan : मुंबईच्या अंधेरी पश्चिम (Andheri Fire) भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे.  चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) आगामी सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता. सेटवर लायटिंगचे काम सुरू असताना आग लागली आहे. 


रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लव रंजन (Luv Ranjan) सांभाळत आहे. तर लव रंजनचे 'लव फिल्म्स प्रोडक्शन' या सिनेमाची निर्मिती करत आहे. 'लव फिल्म्स प्रोडक्शन'ने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली होती. 






रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा सिनेमा 26 जानेवारीला होणार प्रदर्शित


लव रंजन दिग्दर्शित सिनेमा 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अभिनेत्री डिंपल कपाडिया या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या नावासंदर्भात अजून कोणतीही घोषणा लव फिल्म्सने केली नाही. या सिनेमात रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असल्याने प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 


सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे शूटिंग पॅरिसला झाले होते. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्येत कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे. लव यांच्या आगामी सिनेमासह  रणबीरचा  'ब्रम्हास्त्र' सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर आणि आलिया प्रमुख भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


संबंधित बातम्या


Andheri Fire : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना


Ranbir Kapoor-Shraddha Kapoor : लव रंजनचा नवा चित्रपट; रणबीर- श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र, चाहते उत्सुक