ananya pandey and Aditya roy kapur : मागील अनेक दिवसांपासून बॉलीवूडमधील दोन कलाकारांच्या मागील अनेक दिवसांपासून अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. बॉलीवूड अभिनेत्री आणि चंकी पांडे (Chankey Pandey) यांची लेक अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या (Aditya roy kapur) अफेअरच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. पण आता या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरलाय. 


अनन्या पांडे हिने नुकतच तिच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलंय. अनेकदा अनन्याने आदित्यला डेट करत असल्याच्या हिंटही दिल्या होत्या. त्यातच अनेकदा एकत्र दोघे डेटवर गेल्याचे स्पॉट झाले होते. आदित्य अनन्याच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती.  






अनन्याने पोस्टमध्ये काय म्हटलं?


अनन्याने तिच्या इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत पोस्ट केली होती. यावर तिने म्हटलं होतं की, जर तो तुमचा असेल तर तो नक्कीच परत येईल. हे सर्व फक्त तुम्हाला धडा शिकवण्यासाठी आहे. जर तो तुमचा असेल तर तो परत येईल. त्याचप्रमाणे यावेळी तिने या #Motivation असं कॅप्शन दिलं आहे.







अनन्या पांडे कधी लग्न करणार? (Ananya Pandey on Wedding)


'ड्रीम गर्ल 2' फेम अभिनेत्री अनन्या पांडे लग्न कधी करणार? याबद्दल उत्तर देत म्हणाली,"मला प्रेमविवाह करायला आवडेल. माझ्या आई-वडिलांचा संसार प्रेम, आदर आणि मैत्रीवरचं टिकून आहे. मीदेखील त्यांचा फंडा फॉलो करणार आहे. खरंतर मी खूपच रोमँटिक आहे. प्रेमावर माझा विश्वास आहे. आता मी फक्त 26 वर्षांची आहे. त्यामुळे लग्नाबद्दल अजून तरी विचार केलेला नाही. अजून मला खूप काम करायचं आहे". 






ही बातमी वाचा : 


Sanjay Mone on Raj Thackeray : 'शिवतीर्थावर येणाऱ्या लोकांच्या मनात असेल तेच राज ठाकरे बोलतील', अभिनेते संजय मोनेंचं सूचक वक्तव्य