Mirzapur 3 :  ओटीटी प्लॅटफॉर्मवर  'मिर्झापूर' ( Mirzapur) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.  'मिर्झापूर-3' ची ( Mirzapur Season 3 ) घोषणा झाल्यानंतर आता रिलीज डेटवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.  'मिर्झापूर-3'  ( Mirzapur Season 3 ) प्रतीक्षा असताना दुसरीकडे आता  'मिर्झापूर'च्या चौथ्या सीझनचीही चर्चा सुरू झाली आहे. 


बीना भाभीने दिले  'मिर्झापूर-4' बद्दल संकेत 


'मिर्झापूर'मध्ये कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठीची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने सीरिजच्या चौथ्या सीझनबद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे. 'मिर्झापूर'चा चौथा सीझन हा  'मिर्झापूर' मालिकेचा शेवटचा भाग असू शकतो.  


'मिर्झापूर 4' असणार शेवटचा सीझन


टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रसिका दुग्गलने सांगितले की,  'मिर्झापूर'च्या या सीरिजमधील सीझन चार हा शेवटचा ठरू शकतो. यामध्ये कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्याचा खेळ खल्लास होण्याची शक्यता आहे. मिर्झापूर-3 मध्ये आता गुड्डू भैय्याचे वर्चस्व असणार आहे. तर, अखंडानंद त्रिपाठीदेखील जोरदार कमबॅक करणार आहे. रसिका दुग्गलच्या मते या गँगवॉरचा शेवट  मिर्झापूरच्या चौथ्या सीझनमध्ये होणार आहे. 






'मिर्झापूर-3' वाढवणार चौथ्या सीझनची उत्सुकता


वृत्तानुसार, रसिकाने सांगितले की, आता प्रेक्षकांनी 'मिर्झापूर-3' पाहिल्यानंतर त्यांच्या मनात चौथ्या सीझनबद्दल उत्सुकता निर्माण होईल. 'मिर्झापूर-3'मध्ये खूप मोठे फेरफार झाले आहे. मुन्ना भैय्याचा मृत्यू झाला आहे. तर, कालीन भैय्याने कसाबसा आपला जीव वाचवला आहे. गुड्डू भैय्या आता गुन्हेगारी जगताचा बादशाह झाला असून कालीन भैय्याचे साम्राज्य हस्तगत केले आहे. 'मिर्झापूर-3'मध्ये बीना त्रिपाठीची महत्त्वाची व्यक्तीरेखा आहे. बीना आता स्वत: च्या मुलाला बाहुबली बनवण्याच्या तयारीत आहे. 


कधी रिलीज होणार तिसरा सीझन?


'मिर्झापूर'चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रसारित झाला होता. पहिल्या सीझन सुपरहिट झाला. त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला. 'मिर्झापूर 2' पासून चाहते तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता 4 वर्षांनंतर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. निर्मात्यांनी या वेब सीरिजचे पोस्टर रिलीज केले आहे. मात्र, अद्याप रिलीज डेट समोर आली नाही. 


इतर संबंधित बातम्या: