मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) विवाहबंधनात अडकले आहेत. 12 जुलै रोजी यांच्या शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला देश-विदेशातील दिग्गज नेते, उद्योगपती आणि कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा होती, तो अखेर संपन्न झाला. राधिका मर्चंट अंबानी कुटुंबाची धाकटी सून बनली आहे. निमित्ताने राधिका मर्चंट नेमकी कोण आहे, राधिका आणि अनंतची लव्ह स्टोरी कशी आहे, दोघांची भेट कशी झाली, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.


अनंत-राधिकाची लव्ह स्टोरी


राधिका मर्चंट उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचं वय 29 वर्ष आहे. राधिका मर्चंट वडील वीरेन मर्चंट यांच्यासोबत मिळून व्यवसाय सांभाळते. वीरेन मर्चंट फार्मा व्यवसायात आहेत. वीरेन मर्चंट ग्लोबल फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर एनकोर हेल्थकेअर (Encore Healthcare) कंपनीचे सीईओ आहेत. 




अनंत-राधिकाची पहिली भेट


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची पहिली भेट 2017 मध्ये झाली. मित्रमंडळींसोबत असताना राधिका आणि अनंत पहिल्यांदा भेटले. अनंत आणि राधिका दोघांचंही वय 29 वर्ष आहे.  अनंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे, तर राधिका वडिलांच्या फार्मा बिझनेसमध्ये मदत करते. 


US मधून पदवी शिक्षण


राधिका मर्चंटने मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं . त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. न्यूयॉर्क विद्यापीठातून तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं. राधिकाने पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर तिने मुंबईतील एका कंपनीत इंटर्नशिप केली आणि त्यानंतर वडिलांच्या कंपनीत रुजू झाली. ती वडिलांच्या कंपनीतील बोर्ड मेंबर म्हणजेच संचालक मंडळातील सदस्यही आहे.


राधिका मर्चंट शास्त्रीय नृत्यांगणा


अंबानी घराण्याची धाकटी सून असलेल्या राधिका मर्चंटलाही डान्सची प्रचंड आवड आहे. राधिका प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे. नीता अंबानी एक शास्त्रीय नृत्यांगणा देखील आहेत आणि त्यांना अनेकदा अंबानी कुटुंबातील अनेक फंक्शन्समध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवलं आहे. मुलगा अनंतच्या लग्नाच्या अनेक फंक्शनमध्येही त्यांनी शास्त्रीय नृत्य सादर केलं होतं.