Amruta Fadnavis: गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे जय लक्ष्मी माता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता अमृता फडणवीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज करणार आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.
अमृता फडणवीस यांची पोस्टअमृता फडणवीस यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए , तेरे नाल ही नचणा वे! वर्षातील सर्वात मोठे बॅचलरेट गीत, हे 6 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.' अमृता फडणवीस यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स:
अनेक नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं अमृता यांच्या पोस्टला कमेंट केली, 'बॉलिवूड एन्ट्री?' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'आऊटस्टँडिंग'
अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अमृता फडणवीस या ब्यू डेनिम जिन्स, कलरफूल ज्वेलरी, पिंक जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहेत.
मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत. त्याचं 'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Mrunal Thakur: मृणाल ठाकुरचा नवा चित्रपट; 'नानी-30' मध्ये साकारणार भूमिका