Alia Bhatt On Motherhood : आलिया भट्टने (Alia Bhatt) लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. 2022 हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरलं आहे. पण दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. आता या सर्व ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
आलिया-रणबीरने (Ranbir Kapoor) त्यांच्या लेकीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली,"करिअर चांगलं सुरू असताना मी आई होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा होता".
आलिया पुढे म्हणाली,"लग्नानंतर किंवा आई झाल्यानंतरदेखील माझी कोणतीही गोष्ट बदललेली नाही. कामाला सुरुवात केल्यानंतरही काहीही बदलणार नाही. आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही पश्चाताप होणार नाही. माझा निर्णय हा योग्यच आहे".
काम मिळालं नाही तरी काहीही फरक पडत नाही : आलिया भट्ट
आलिया म्हणाली,"सध्या मला लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. एक अभिनेत्री म्हणून माझा स्वत:वर खूप विश्वास आहे. मेहनत करण्याची तयारी असले, कलाकार म्हणून वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच काम मिळेल. जर तुम्हाला काम मिळालं नाही तर ती संधी तुमची नाही हे तुम्हाला माहीत असायला हवं".
आलिया पुढे म्हणाली,"मी कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाही. सध्या मी मातृत्वाचा आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यात काम, करिअर हे पहिल्या क्रमांकावरच आहे. पण तुम्हाला वैयक्तिक आयुष्य आणि करिअर या दोन्ही गोष्टींची सांगड घालायला हवी. त्याक्षणी ते करा".
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आलिया-रणबीर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. आता त्यांना 'राहा' नावाची एक मुलगी आहे.
संबंधित बातम्या