Besharam Rang: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. आता या गाण्याची चर्चा पुन्हा सोशल मीडियावर होत आहे. एका पाकिस्तानी गायकानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे आता बेशरम रंग या गाण्यावर अनेक नेटकरी टीका करत आहेत.
पाकिस्तानी गायक सज्जाद अलीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये सज्जाद हा 'अब के हम बिछडे' हे गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओला सज्जादनं कॅप्शन दिलं, 'नवीन चित्रपटाचे गाणे ऐकल्यानंतर, मला माझ्या 26 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'अब के हम बिछडे' या गाण्याची आठवण आली.'सज्जाद अलीच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. 'बेशरम रंग या गाण्याची निर्मिती 'अब के हम बिछडे' या गाण्याची कॉपी करुन करण्यात आली आहे का' असा प्रश्न आता सज्जाद अली यांचं हे गाणं ऐकल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
पाहा व्हिडीओ:
250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग 8 देशांमध्ये झाले आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: