Amitabh Bachchan Bankurpt: बालीवूडचे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे  भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट समोर आली आहे. ज्यामध्ये शाहरुख खानने श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. या यादीत अमिताभ बच्चन 1600 कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. आता, बिग बी 1600 कोटींच्या मालमत्तेचे मालक असताना, एक वेळ अशी होती की त्यांचं दिवाळं निघालं होतं. 


आता जरी श्रीमंतांच्या यादी चौथ्या स्थानावर असले तरीही एक वेळ अशी होती की, त्यांच्यावर 90 कोटींचं कर्ज होतं. अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा त्यांचा जुना काळ आठवतात तेव्हा ते भावुक होतात. अमिताभ बच्चन यांनी स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केले होते. त्यावेळी त्यांच्या वाट्याला अपयश आलं होतं आणि त्यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं होतं. 


व्यवसाय सुरु केल्यानंतर वाट्याला आलं अपयश


दरम्यान अमिताभ बच्चन यांनी करिअरच्या शिखरावर असतानाच व्यवसाय क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत:ची एबीसीएएल कंपनी सुरू केली. या कंपनीकडून बिग बींना सुरुवातीच्या काळात खूप यश मिळालं. पण दुसऱ्याच वर्षात कंपनीला मोठा तोटा झाला. या तोट्यामुळे ही कंपनी आणि अमिताभ हे कोट्यवधींच्या कर्जा बुडाले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अमिताभ यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. 


धीरूभाई अंबानी यांनी दिला होता मदतीचा हात


ती कंपनी तोट्यात गेली तेव्हा अमिताभ हे 90 कोटींच्या कर्जात बुडाले होते. त्यानंतर धीरूभाई अंबानी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. जेव्हा त्यांना बिग बींची अवस्था कळली तेव्हा त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनिल अंबानी यांना सांगितले की - 'त्याचा काळ खराब आहे, त्याला थोडे पैसे द्या.' मात्र अमिताभ बच्चन यांनी त्यांची मदत घेण्यास नकार दिला. कर्ज आपण स्वतः फेडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.


असे बदललेले दिवस


कठीण काळानंतर, अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती होस्ट करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचे दिवस बदलले. हा शो होस्ट करण्यासाठी अमिताभ बच्चन सुरुवातीच्या काळात 25 लाख रुपये आकारत होते. त्यामुळे हळूहळू त्यांचे कर्ज कमी होऊ लागले आणि त्यांनी सर्व कर्ज फेडले.आतापर्यंत त्यांनी या कार्यक्रमाचे 15 सीझन होस्ट केले आहे.फक्त तिसरा सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला नव्हता. आता बिग बी प्रत्येक सिझन होस्ट करण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये आकारतात. 


ही बातमी वाचा : 


Emergency Movie Release Date  : कंगना रणौतला मोठा झटका, इमर्जन्सीच्या रिलीजला ब्रेक; सेन्सॉरकडून प्रमाणपत्रासाठीही धडपड