मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन आणि तेलुगू सिनेमातील ‘इंद्रा’ अर्थात अभिनेते चिरंजीवी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हे दोन्ही दिग्गज अभिनेते एकाच सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘उयालवाडा नरसिंह रेड्डी’ या सिनेमातून हे दोन्ही दिग्गज अभिनेते एकत्र दिसतील. अभिनेते चिरंजीवी यांनी चित्रिकरणास सुरुवातही केली आहे. मात्र, याचदरम्यान आता अशीही माहिती समोर येतेय की, या सिनेमात अमिताभ बच्चन हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
आपापल्या सिनेसृष्टीतील दोन महान कलाकार एकाच सिनेमातून दिसणार असल्याचे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमिताभ आणि चिरंजीवी यांची नेमकी भूमिका काय असेल, हे अद्याप कळू शकलं नसलं, तर दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्याच असतील, एवढं नक्की.
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2017 06:31 PM (IST)
हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन आणि तेलुगू सिनेमातील ‘इंद्रा’ अर्थात अभिनेते चिरंजीवी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -