Amitabh Bachchan: अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना बऱ्याच महिन्यांपासून उधाण आलंय. त्यातच अनेकदा त्यांच्या या चर्चांना पूर्णविराम मिळेल अशा घटनाही घडतात. त्यानंतर पुन्हा या चर्चा जोर धरतात. त्यातच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देखील त्यांच्या सोशल मीडियावरील ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांविषयी बोलणाऱ्यांवर भाष्य करत असतात. नुकतच अमिताभ यांचा असाच एक ब्लॉग चर्चेत आला आहे. 


अमिताभ यांची ही पोस्ट अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आलेली आहे. याआधी देखील अमिताभ बच्चन यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांवर तीव्र रोष व्यक्त केला होता. आताही अमिताभ यांनी अशा गोष्टींवर चर्चा करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला असल्याचं पाहायला मिळतंय. "मी कुटुंबाबद्दल क्वचितच बोलतो कारण मला आमची प्रायव्हसी जपायची असते. अफवा या केवळ अफवाच असतात.


अमिताभ यांची पोस्ट नेमकी काय?


अमिताभ यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “या जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमतरता नाही. हे असे लोक आहेत, जे इतरांबद्दल खोट्या किंवा बनावट गोष्टी पसरवत असतात.  खरं तर, असे लोक इतरांच्या आडून स्वतःचे दुष्कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतात. अशी माहिती पसरवणाऱ्यांच्या व्यवसायाला मी आव्हान देणार नाही आणि समाजसेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करेन.


पुढे त्यांनी म्हटलं की,  "तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुम्ही दिलेला हा खोटा कंटेंट भविष्यासाठीही तयार केला जात आहे. जेव्हा लोक अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देतात तेव्हा अशा गोष्टी आपोआप वाढतात आणि लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. काही काळानंतर, हा व्यवसाय बनतो.


ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या


बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक (Abhishekh Bachchan) सध्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसत नाहीत. अशातच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या नात्याचं काय झालं? याबाबत इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.                                   


ही बातमी वाचा : 


Abhijeet Bichukale : EVM विरोधातील लढ्यात अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री, म्हणाले, हजार लोकांनी सेल्फी काढले,200 मतं तरी...