Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. संपूर्ण बच्चन कुटुंब फिल्मी जगात सक्रीय आहे. आता त्यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) सिनेमांपासून दूर असली तरी कायमच चर्चेचा भाग असते. श्वेताचा पती बि बींचा जावई निखिल नंदा (Nikhil Nanda) मात्र लाईमलाईटपासून दूर आहेत. अमिताभ बच्चन यांचा जावई कोण आहे? काय करतो हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


अमिताभ बच्चन यांचा जावई निखिल नंदा प्रसिद्धीपासून दूर आहे. पण उद्योगक्षेत्रात त्यांचे चांगलचं नाव आहे. निखिल नंदा यांचं कपूर घराण्यासोबत खास कनेक्शन आहे. उद्योगपती असलेले निखिल नंदा खूपच श्रीमंत आहेत.


कोण आहे निखिल नंदा? (Who is Nikhil Nanda)


निखिल नंदाचा जन्म 18 मार्च 1975 रोजी दिल्लीत झाला आहे. निखिलच्या वडिलांचं नाव राज नंदा (Raj Nanda) आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, सिनेदिग्दर्शक, निर्माते राज कपूर (Raj Kapoor) यांची मुलगी ऋतु कपूर (Ritu Kapoor) यांच्यासोबत राज नंदा लग्नबंधनात अडकले. निखिल नंदा हे राज कपूर यांचे नातू आहेत. 1997 मध्ये ते अमिताभ बच्चन यांचे जावई झाले.


अमिताभ बच्चन यांचा जावई सिनेसृष्टीपासून दूर


निखिल नंदा सिनेमांत काम करत नसले तरी सिनेसृष्टीसोबत त्यांचं खूप जुनं नातं आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचं लग्न 1997 मध्ये इस्कॉर्ट कंपनीचे मालक राजन नंदा यांचा एकुलता एक मुलगा निखिल नंदासोबत लावलं होतं. निखिल नंदा आणि श्वेता बच्चन यांना दोन मुलं आहेत. नव्या नवेली आणि अगस्त्य नंदा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. नव्या पॉडकास्ट चालवते. तसेच काही सामाजिक संस्थासोबतदेखील ती जोडली गेली आहे.


अगस्त्यने 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचा भाचा निखिल नंदा दिल्लीतील एक लोकप्रिय उद्योगपती आहे. एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ते ट्रॅक्टर बनवतात. या व्यावसायासह त्याचे अनेक व्यावसाय आहेत. निखिलचे वडील राजन नंदा यांचे 2018 मध्ये निधन झाले. त्यानंतर संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी निखिल यांच्या खांद्यावर आली. 


निखिल नंदा यांचं कपूर घराण्यासोबत खास कनेक्शन


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चनचे पती निखिल नंदा आहेत. राज कपूर यांची मुलगी ऋतू कपूर नंदाच्या एकुलत्या एक मुलाचं नाव निखिल नंदा आहे. रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे निखिल नंदाचे मामा लागतात. त्यामुळे करिश्मा कपूर, करीना कपूर आणि रणबीर कपूर हे निखिलच्या मामांची मुले आहेत. 


निखिल नंदा काय काम करतात? (Nikhil Nanda Business)


निखिल नंदा यांचं शालेय शिक्षण देहरादून येथील एका शाळेत झालं आहे. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. निखिल नंदा यांची वित्त आणि मार्केटिंग या क्षेत्रात सक्रीय आहेत. एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीचे ती संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 1944 रोजी या कंपनीची स्थापना झाली आहे. कंस्ट्रक्शन संबंधित गोष्टी या ट्रॅक्टर निर्मितीची कामे या कंपनीत केली जातात. हे सामान विदेशातदेखील एक्सपोर्स केलं जातं.


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : रुग्णालयातून डिस्चार्ज, अमिताभ बच्चन थेट स्टेडियममध्ये; 'सचिन'सोबत लुटली क्रिकेट सामन्याची मजा