Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते घरीच कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झाली असली तरी ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. प्रकृतीसंदर्भात माहिती देणारा एक ब्लॉग त्यांनी लिहिला आहे. आपली सर्व कामं आपण स्वत: करतोय असं ते ब्लॉगच्या माध्यमातून म्हणाले आहेत. 


अमिताभ यांना कोरोनाकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमिताभ त्यांची सर्व कामं स्वत: करत आहेत. स्वत: चे कपडे धुण्यापासून ते टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यंत ते घरातील सर्व कामं करत आहेत. अमिताभ त्यांना लागणारे चहा-कॉफीदेखील बनवत आहेत. 


ट्वीट करत दिली कोरोनाची लागण झाल्याची माहिती


अमिताभ यांनी ट्वीट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यांनी लिहिलं होतं,"मी नुकतीच कोरोना चाचणी केली असून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी". 


अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. 




अमिताभ बच्चन यांना पहिल्या लाटेतदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यालादेखील कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या लाटेत अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती


KBC : केबीसीच्या स्पर्धकांना मिळत नाही बक्षिसाची पूर्ण रक्कम; कापले जातात एवढे पैसे, जाणून घ्या...