Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा सध्या त्याच्या 'आय वॉन्ट टू टॉक' या सिनेमामुळे बराच चर्चेत आहे. या सिनेमात अभिषेक एका आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांची भूमिका साकारतोय. पण असं असतानाच अभिषेक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आलाय. कारण अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.
अभिषेक ऐश्वर्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाहीये. पण या सगळ्या चर्चांदरम्यान अभिषेकने नुकतच ऐश्वर्याचं कौतुक केलंय आणि तिचे आभारही मानले आहेत. आराध्यासाठी ऐश्वर्या घरी असते, म्हणूनच मी काम करु शकतो, असं अभिषेकने म्हटलं आहे.
अभिषेकने नेमकं काय म्हटलं?
'द हिंदू'सोबत संवाद साधताना अभिषेकने म्हटलं की, मी खरंच खूप भाग्यवान आहे की, मला बाहेर जाऊन सिनेमा करण्याचा संधी मिळतेय. कारण मला माहितेय की आराध्यासोबत घरी ऐश्वर्या आहेत. त्यासाठी मी तिचे खरंच आभार मानतो. मुलं तुम्हाला कधीच कोणती तिसरी व्यक्ती म्हणून पाहत नाही. ते कायमच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली पहिली व्यक्ती म्हणून पाहत असतात.
पुढे त्याने म्हटलं की, जेव्हा माझा जन्म झाला, त्यावेळी माझ्या आईने अभिनय करायचा नाही, असा निर्णय घेतला. कारण तिला तिच्या मुलांसोबत वेळ घालवायचा होता. आम्हाला कधीच वडील आपल्या आजूबाजूला आहेत, ही जाणीव झाली नाही, कारण ते कायमच कामासाठी बाहेर असायचे आणि त्यांची उणीव आम्हाला भासायची.
लेक आराध्याच्या बर्थडेला अभिषेक गैरहजर
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, या जोडप्याने किंवा बच्चन कुटुंबाने या अफवांबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बुधवारी, ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या बच्चनने दिवंगत वडील कृष्णराज राय यांची जयंती साजरी करण्यासाठी तिची आई वृंदा राय यांना भेटायला गेली होती. ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवसही साजरा केला. पण, या सेलिब्रेशनमध्ये ती एकटीच होती, यामध्ये अभिषेक बच्चन दिसला नाही.