Shweta Bachchan Sends Gift To Shrima Rai: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या बरेच चर्चेत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच ऐश्वर्याचं आणि अभिषेकची बहिण श्वेता नंदा (Shweta Nanda) हिचं पटत नसल्याचं म्हटलं जातंय. त्यातच आता श्वेताच्या एका कृतीमुळे या सर्व चर्चांचं खंडन केलंय का असंही विचारण्यात आलंय. 


बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, श्वेता बच्चनने ऐश्वर्या रायचा भाऊ आदित्य रायची पत्नी श्रीमा रायली एक खास भेटवस्तू पाठवली आहे. खुद्द ऐश्वर्याची वहिनी श्रीमा हिनेच याविषयी माहिती दिलीये. श्रीमाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती ज्यामध्ये फुलांचा एक सुंदर गुच्छ दिसत होता.हा गुच्छ तिला श्वेता नंदाने पाठवला असल्याचंही यामध्ये स्पष्ट होत आहे. 


श्रीमाने शेअर केली खास पोस्ट


सूर्यफूल आणि गुलाबांचा हा गुच्छ अगदी आकर्षक दिसत असल्याचं पाहायला मिळालं. पुष्पगुच्छाचा फोटो शेअर करताना श्रीमा रायने कॅप्शनमध्ये म्हटलं की, हे गिफ्ट तिला श्वेता बच्चन आणि तिचा पती निखिल नंदा यांनी पाठवलं आहे. ऐश्वर्याच्या वहिनीने कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'धन्यवाद श्वेता बच्चन आणि निखिल नंदा, हे खूप सुंदर आहे.'




अभिषेकने ऐश्वर्याचे मानले आभार


'द हिंदू'सोबत संवाद साधताना अभिषेकने म्हटलं की, मी खरंच खूप भाग्यवान आहे की, मला बाहेर जाऊन सिनेमा करण्याचा संधी मिळतेय. कारण मला माहितेय की आराध्यासोबत घरी ऐश्वर्या आहेत. त्यासाठी मी तिचे खरंच आभार मानतो. मुलं तुम्हाला कधीच कोणती तिसरी व्यक्ती म्हणून पाहत नाही. ते कायमच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली पहिली व्यक्ती म्हणून पाहत असतात.
 
पुढे त्याने म्हटलं की, जेव्हा माझा जन्म झाला, त्यावेळी माझ्या आईने अभिनय करायचा नाही, असा निर्णय घेतला. कारण तिला तिच्या मुलांसोबत वेळ घालवायचा होता. आम्हाला कधीच वडील आपल्या आजूबाजूला आहेत, ही जाणीव झाली नाही, कारण ते कायमच कामासाठी बाहेर असायचे आणि त्यांची उणीव आम्हाला भासायची.                  


ही बातमी वाचा : 


Abhishek Bachchan : अभिषेकने अखेर ऐश्वर्यावर भाष्य केलंच, चर्चांना पुन्हा उधाण; म्हणाला, ती घरी बसते म्हणून...