Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या गदर-2 (Gadar 2) या आगमी चित्रपटामुळे चर्चेत आहे. गदर-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. गदर-2 चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमिषानं ओटीटीवरील कंटेन्टबाबत सांगितलं. 


एका मुलाखतीमध्ये अमिषा ओटीटीवरील कंटेन्टबाबत म्हणाली, 'प्रेक्षकांना फक्त क्लिन फिल्म्स बघायला आवडतात. त्यांना असा चित्रपट बघायचा असतो, ज्याचा आनंद ते कुटुंबासोबत बसून घेऊ शकतात. आजकाल ओटीटीवर खूप वेगळा कंटेन्ट दाखवला जात आहे. हा कंटेन्ट काही वयोगटातील लोकांसाठी योग्य नाही. असा कंटेन्ट दिसत नाही, जो आपल्या मुलांसोबत आणि आजी-आजोबांसोबत बसून बघितला जाऊ शकतो.'


पुढे अमिषा म्हणाली,  'समलैंगिक विषयावर आधारित असणारा चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल बोलायचे तर ते ओटीटीवर खूप दाखवले जात आहेत. ओटीटीवर आता पूर्णपणे होमो, लेस्बियन यांच्यावर आधारित सीन्स दाखवले जातात, जे बघताना तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोळ्यांवर हात ठेवावा लागतो. अनेक वेळा तुम्हाला टीव्हीला चाइल्ड लॉकही लावावे लागते, जेणेकरून लहान मुलं OTT प्लॅटफॉर्म ओपन करू शकणार नाहीत.'


'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड', ‘भूलभुलैया’ आणि ‘रेस 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अमिषानं काम केलं आहे. अमिषानं तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता अमिषाच्या 'गदर 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'गदर 2' या चित्रपटामध्ये  अमिषा 'सकीना' ही भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय सनी देओल 'तारा सिंह' ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. 






 'गदर 2' हा चित्रपट 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.गदर एक प्रेम कथाने 22 वर्षांपूर्वी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता 'गदर 2'हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अमिषा आणि सनी देओल यांची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Gadar 2: अमिषा पटेलनं गदर-2 चित्रपटाबाबत शेअर केली पोस्ट; नेटकरी म्हणाले, 'काहीच सस्पेन्स राहिला नाही'