Spruha Joshi Relation With Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सध्या 'लोकमान्य' (Lokmanya) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. स्पृहाच्या घरी लवकरच सासूबाई येणार असल्याची चर्चा आहे. स्पृहाची होणारी सासूबाई नक्की कोण आहे हे  जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


स्पृहा जोशीची होणारी सासूबाई कोण आहे? (Spruha Joshi Mother In Law)


'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटेने (Prathamesh Laghate) गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं जगजाहीर केलं आहे. तेव्हापासून त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. पण आता स्पृहा जोशी आणि  प्रथमेश लघाटे एकमेकांचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. स्पृहाचा पती वरद आणि प्रथमेशचं नातं आहे. प्रथमेश हा स्पृहाचा सासरा आहे. त्यामुळे आता स्पहाची होणारी सून मुग्धा वैशंपायन असल्याचं समोर आलं आहे. 


मुग्धा आणि प्रथमेशने 'आमचं ठरलंय' असं म्हणत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पण अभिनेत्री स्पृहा जोशीच्या कमेंटने (Spruha Joshi Comment) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रथमेशच्या पोस्टवर स्पृहाने कमेंट केली होती की,"व्हा बुवा... वहिनी तुमचं स्वागत आहे". तिच्या या पोस्टवर अवधूत गुप्तेने लिहिलं होतं,"जीजूंचं स्वागत नाही करणार का?". त्यावर कमेंट करत स्पृहाने लिहिलं होतं,"अहो सर... ते आधीच सासरे आहेत माझे". तर यावर प्रथमेशने कमेंट करत लिहिलं आहे,"सासरा आहे मी तिचा". तर मुग्धाने लिहिलं आहे,"मी सासू... नो...".


स्पृहा जोशी आणि वरदची फिल्मी लव्हस्टोरी (Spruha Joshi Lovestory)


स्पृहा आणि वरदची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. एका मुलाखतीत स्पृहाने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली,"कॉलेजमध्ये असताना मी आणि वरद एका वृत्तपत्रासाठी कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. सुरुवातीला एका प्रोजेक्टवर एकत्र काम करताना आपच्यात खूप खटके उडायचे. पण त्यावेळी आमची छान मैत्री झाली आणि आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली". स्पृहा आणि वरद 2014 मध्ये लग्नबंधनात अडकले आहे. आजही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 


संबंधित बातम्या


दिलखुलास हास्य आणि निखळ सौंदर्य; स्पृहा जिंकतीये सर्वांची मनं!