All India Rank Trailer Varun Grover :  'सेक्रेड गेम्स'सारखी वेब सीरीज आणि 'मसान' (Masan) सारख्या चित्रपटाचा लेखक वरुण ग्रोव्हर (Varun Grover) आता रुपेरी पडद्यावर नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाला आहे. वरुण ग्रोव्हर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 'ऑल इंडिया रँक' (All India Rank) या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले असून आज त्याचा ट्रेलर लाँच (All India Rank Trailer Launch) करण्यात आला आहे. 


आयआयटीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटातील कथा 90 च्या दशकातील  असल्याचे याआधीच पोस्टर लाँचवेळी दर्शवण्यात आले होते. 12 व्या धरमशाळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात या चित्रपटाने करण्यात आली. 


मसान आणि सेक्रेड गेम्ससाठी सुंदर आणि दमदार कथा लिहिण्यासाठी ओळखला जाणारा वरुण ग्रोव्हर 'ऑल इंडिया रँक'या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात चांगल्या ट्यूनसह होते. हा चित्रपट आयआयटीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव, पालकांच्या अपेक्षा, हॉस्टेलमधील जीवन, किशोरवयीन अवस्थेतील प्रेम, अशा विविध मुद्यांवर चित्रपट भाष्य करत असल्याचे ट्रेलरमधून दिसत आहे.'ऑल इंडिया रँक' आयआयटीयन होण्याच्या शर्यतीत लढणाऱ्या प्रत्येक किशोरवयीन मुलाची ही कहाणी आहे.


विकी कौशलने शेअर केला ट्रेलर 


अभिनेता विकी कौशलने ऑल इंडिया रँक चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला. यावेळी विकी कौशल याने म्हटले की, आम्हा दोघा इंजिनियर्सचा चित्रपटसृष्टीतील प्रवास जवळपास एकाच वेळी सुरू झाला... 'मसान'सह. साला ये दुख काहे खत्म नही होता बे! ही वरुणने लिहिलेली ओळ माझ्या मागील काही वर्षातील फिल्मोग्राफीपेक्षा अधिक चांगली आहे. 







कलाकार कोण? कधी होणार रिलीज?


बोधिसत्व शर्मा, समता सुदीक्षा, शशी भूषण, गीता अग्रवाल आणि शीबा चड्ढा आदी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.