Alka Yagnik: हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका  अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. अलका यांचा आज  57 वा वाढदिवस आहे. अलका यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहीत नसेल. गायिका अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांनी 1989 मध्ये लग्न केलं. पण लग्न करुनही त्या नीरज यांच्यापासून 27 वर्ष दूर राहिल्या, यामागचं कारण काय होतं? अलका आणि नीरज यांची भेट कशी झाली? याबाबत जाणून घेऊयात...


अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांची लव्ह स्टोरी


'पायल की झंकार'  या चित्रपटातील 'थिरकता अंग लचक झुकी' या गाण्यानं अलका यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. अलका यांनी गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत होती. अलका यांची शिलाँगचे उद्योगपती नीरज कपूर यांच्यासोबत एका रेल्वे स्टेशनवर ओळख झाली. आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 


1988 मध्ये नीरज आणि अलका यांनी आपल्या आई-वडिलांना त्यांच्या नात्याबाबत सांगितलं. दोघांच्या पालकांनी त्यांच्या नात्याला होकार दिला. 1989 मध्ये अलका आणि नीरज यांनी लग्नगाठ बांधली. अलका याज्ञिक या  27 वर्षांपासून पती नीरजपासून वेगळ्या राहात आहेत. अलक या करिअरसाठी मुंबईत रहात आहेत तर नीरज हे शिलाँगमध्ये रहात आहेत.  दोघांमध्ये वाद होत असल्यानं दोघे वेगळे राहतात, अशी चर्चा अनेकदा होते. पण अलका यांनी करिअरसाठी नीरज यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं. 


अलका यांची हिट गाणी


अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली. अगर तुम चाहो,परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे... या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  


अलका यांनी केला हा रेकॉर्ड


टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध गायकांना मागे टाकत अलका यांनी यूट्यूबवरील स्ट्रिम चार्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 2022 मध्ये नेटकऱ्यांनी अलका यांची गाणी सर्वाधिक ऐकली. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


गायिका अलका याज्ञिक यांच्या आवाजाची जादू; टेलर स्विफ्ट, BTS ला टाकलं मागे; केला 'हा' रेकॉर्ड