Alia Ranbir Wedding Menu List : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र ऐकू येत आहेत. त्यांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी लखनौहून खास शेफला बोलाविण्यात आले आहे. जो त्यांच्या लग्नाची चव वाढवताना दिसणार आहे. आलियाचे लग्न अगदी जवळच्या लोकांमध्ये होणार आहे. पण तिचा हा खास दिवस अतिशय थाटामाटात साजरा केला जाणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नात खास शाकाहारी काउंटरही असतील.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, आलिया आणि रणबीरचे लग्न कमी पाहुण्यांमध्ये होणार आहे, परंतु या लग्नात सर्वकाही अतिशय रॉयल असेल. कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे खास आणि आवडते पदार्थ त्यांच्या लग्नाच्या मेनूमध्ये ठेवण्यात येणार आहेत. आलियाच्या आवडीनुसार खाद्यपदार्थांचे 25 काउंटर ठेवण्यात आले आहेत. या लग्नात आलियाने जी काही तयारी केली आहे ते सर्व पाहायला मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, तिच्या खास दिवशी, आलिया सब्यसाची मुखर्जीचा लेहेंगा परिधान करताना दिसणार आहे, तर तिच्या सासू नीतू कपूरचा हार दागिन्यांमध्ये परिधान केल्याने तिच्या लुकमध्ये भर पडेल. या दोघांच्या लग्नाचे विधी 14 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. आलिया आणि रणबीरचा भव्य विवाह आरके हाऊसमध्ये होणार असून घरातील प्रत्येक सदस्य या लग्नावर मौन पाळत आहे. पण आरके हाऊसमध्ये सुरू असलेल्या दोघांच्या लग्नाची तयारी लपून राहिलेली नाही. बातमीनुसार, दोघेही पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ranbir-Alia Wedding : आलिया-रणबीर 17 एप्रिलला पंजाबी रितीरिवाजांनुसार अडकणार लग्नबंधनात; हनिमूनचं ठिकाणंही ठरलं
- Yashoda : समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर, सिनेमात अॅक्शनचा तडका
- Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha