Brahmastra Teaser Song : अभिनेत्री  आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता  रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे, अशी चर्चा  सध्या सुरू आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. 


अयाननं ब्रम्हास्त्रमधील गाण्याची झलक शेअर केली आहे. अयाननं हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ' आलिया आणि रणबीरसाठी खास... हे दोघे लवकर नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. हे दोघे माझ्या आयुष्यातील जवळचे व्यक्ती आहेत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. 'रिपोर्टनुसार, आर. के. स्टुडिओमध्ये रणबीर आणि आलियाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. 






रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर 13 ते 17 एप्रिल दरम्यान लग्नगाठ बांधणार आहेत.  त्यांच्या कुटुंबाने लग्नाच्या तयारीला सुरूवात देखील झाली आहे. चेंबूर येथील आरके स्टुडिओचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या संपूर्ण स्टुडिओला रोषणाई करण्यात आली आहे. स्टुडिओ इमारतीसह झाडांवर या लाईट्स लावण्यात आल्या आहेत. 


संबंधित बातम्या