Mother's Day 2023: बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक अभिनेत्रींच्या घरी यावर्षी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. काही अभिनेत्री या आज आई झाल्यानंतरचा पहिला मदर्स-डे (Mother's Day 2023) साजरा करत आहेत. या अभिनेत्रींसाठी यंदाचा मदर्स-डे खास असणार आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रींबद्दल...


गौहर खान (Gauahar Khan)



बिग बॉस 7 ची विजेती गौहर खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. गौहर आणि तिचा पती जैद दरबार हे 10 मे रोजी एका मुलाचे पालक झाले. सोशल मीडियावर गौहरनं ही गूडन्यू चाहत्यांना दिली. आता गौरहचा आई झाल्यानंतरचा हा पहिला मदर्स-डे आहे. 






बिपाशा बसू (Bipasha Basu)



बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर पालक झाले आहेत. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी गोंडस मुलीचं आगामन झालं. आता बिपाशा ही आई झाल्यानंतरचा पहिला मदर्स-डे साजरा करत आहे. 






सोनम कपूर (Sonam Kapoor)



अभिनेत्री सोनम कपूरनं 20 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जान्म दिला. सोनमनं तिच्या मुलाचं नाव वायु असं ठेवले आहे. सोनम ही तिच्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 






आलिया भट्ट ( Alia Bhatt)


अभिनेत्री आलिया भट्ट यंदाचा पहिला मदर्स डे साजरा करणार आहे. आलिया आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Google Doodle: 'मदर्स-डे' निमित्त गूगलचं क्यूट डूडल; चित्रांद्वारे दाखवलं आईचं प्रेम