Google Doodle: आज मदर्स-डे (Mother's Day 2023) म्हणजेच मातृ दिन आहे. सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (14 मे) एक खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून आईचं प्रेम दाखवण्यात आले आहे. या डूडलमध्ये विविध प्राणी आहेत. आज मदर्स-डे निमित्त तयार करण्यात आलेल्या गूगल डूडलमध्ये काय खास आहे? ते जाणून घेऊयात...
गूगलने विविध प्रकारच्या प्राण्यांच्या चित्राच्या माध्यमातून आई-मुलाचे नाते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रत्येक प्रजातीत आई आणि मुलाचं प्रेम दाखवण्यात आलं आहे. अॅनिमल फॅमिलीची ही छायाचित्रे अतिशय सुंदर आणि क्युट पद्धतीने बनवण्यात आली आहेत. यामध्ये अॅनिमेशनचाही वापर करण्यात आला आहे. गुगल डूडलमधील या प्राण्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लक्ष वेधत आहेत. गूगलनं आज अॅनिमल थ्रोबॅक फोटो Doodler Celine You द्वारे मदर्सृडेच्या शूभेच्छा दिल्या आहेत. गूगल डूडलमध्ये दिसणारे प्राणी हे चिनी मातीपासून तयार करण्यात आले आहेत. या चिनी मातीपासून तयार करण्यात आलेल्या प्राण्यांच्या मेकिंगचे फोटो गूगलनं शेअर केले आहेत.
गूगलनं त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर देखील या डूडलची (Google Doodle) माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'आजचे गूगल डूडल सर्व मातांसाठी आहे!' आई आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी आपल्या सुखाचा, ऐषोआरामाचा त्याग करते. आपल्या मुलांना ती विविध गोष्टी शिकवते, हे या गूगल डूडलद्वारे दाखवण्यात आलं आहे.
प्रत्येक आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच मातृदिन (Mother’s Day). आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, सर्वांसाठी सतत कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मातृदिन साजरा करण्याती पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस (Anna Jarvis) यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं.आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Mother's Day 2023: मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा...