Brahmastra Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी या सिनेमाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
पहिल्याच वीकेंडला 'ब्रह्मास्त्र'चा धमाका
'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने रिलीजआधीच अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत. जगभरात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने जगभरात 225 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'ब्रह्मास्त्र'ने रचला इतिहास
गेल्या काही दिवसांपासून अनेक बिग बजेट बॉलिवूड सिनेमे फ्लॉप होत आहे. अशातच 'ब्रह्मास्त्र'ने रेकॉर्डब्रेक कमाई करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवलं आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला या सिनेमाने जगभरात 225 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणारा हा पहिलाच सिनेमा आहे.
'ब्रह्मास्त्र'ची कमाई जाणून घ्या...
'ब्रह्मास्त्र'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 75 कोटी, शनिवारी 85 कोटी आणि रविवारी 65 कोटींची कमाई केली आहे. हिंदीत या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 31 कोटी, दुसऱ्या दिवशी 37 कोटी तर तिसऱ्या दिवशी 39 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे हिंदीत या सिनेमाने 125 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 225 कोटींची कमाई केली आहे.
'ब्रह्मास्त्र'तील गाणी सोशल मीडियावर व्हायरल
'ब्रह्मास्त्र' सिनेमात आलिया भट्ट, रणबीर कपूरसह अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची झलकदेखील सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया', 'देवा देवा' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावरदेखील ही गाणी व्हायरल होत आहेत. अयान मुखर्जीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संबंधित बातम्या