Akshay Kumar Hair Stylist : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) पर्सनल हेअर स्टायलिस्ट मिलन जाधव (Milan Jadhav) उर्फ मिलानो (Milano) याचं निधन झालं आहे. 15 वर्ष मिलन हा अक्षयसोबत काम करत होता. नुकतीच अक्षयनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन अक्षयनं मिलनला श्रद्धांजली वाहिली.
अक्षयची पोस्ट
'तुझ्या फंकी हेअरस्टाईलमुळे आणि स्माईलमुळे तू सर्वांपेक्षा वेगळा वाटत होतास. माझे केस खराब होणार नाहीत, याकडे तू नेहमी लक्ष द्यायचा. 15 वर्षांपेक्षा जास्त माझा हेअर स्टायलिश मिलन जाधवनं काम केलं. तू आम्हाला सोडून गेला आहेस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी तुला कायम मिस करेल मिलामो. ओम शांती' अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन अक्षयनं मिलानोला श्रद्धांजली वाहिली आहे. या कॅप्शनमध्ये अक्षयनं हार्ट ब्रेकचं इमोजी शेअर केलं आहे. अक्षयनं मिलनसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोला प्रसिद्ध फोटोग्राफर डबू रत्नानीनं 'ओम शांती' अशी कमेंट केली आहे.
अक्षयसोबतच मिलन हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचा हेअर स्टायलिश होता. सोशल मीडियावर तो वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबतचे फोटो शेअर करत होता. करिना कपूर आणि कियारा अडवाणी यांच्यासोबतचे फोटो मिलननं सोशल मीडियावर शेअर केले होते. अक्षयनं भावनिक पोस्ट शेअर करुन मिलनला श्रद्धांजली वाहिली. अक्षयचा 'कठपुतली' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. तसेच त्याचे 'रामसेतु', 'योद्धा' आणि 'ओ माय गॉड' हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Brahmastra OTT Release : घरबसल्या पाहता येणार 'ब्रह्मास्त्र'; 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज