Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची मुलगी राहाचा आज पहिला वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त कपूर कुटुंबीयांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केला आहेत. आता लेकीच्या वाढदिवसानिमित्त आलियानं नुकतीच एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. आलियानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहेत. 


आलिया भट्टची पोस्ट


आलिया भट्टनं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये  राहानं एका केकवर हात ठेवलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राहानं हातात फुल धरलेलं दिसत आहे. आलियानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये राहाचा चेहरा दिसत नाहीये. आलियानं फोटोला कॅप्शन दिलं, "आमचा आनंद, आमचं आयुष्य आणि आमच्या जीवनातील प्रकाश, आपण हे गाणं ऐकत आहोत आणि तू माझ्या पोटात लाथा मारत आहेस, हे सर्व परवा घडलं असं मला वाटत आहे. माझ्याकडे भावना मांडण्यासाठी शब्द नाहीत पण तू आमच्या आयुष्यात आहेस, हे आमचं भाग्य आहे. तू आम्हाला एका चविष्ट केकच्या तुकड्याप्रमाणे वाटत आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी टायगर, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो."






राहाची आजी नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. आलियाची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे, "असं वाटतंय ती आत्ताच या जगात आली आहे. एक वर्ष झालं आहे, असं अजिबात वाटत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा" रिद्धिमा कपूरनं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


आलियाचा आगामी चित्रपट


आलिया ही लवकरच जिगरा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आलियाच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी  'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी  आलिया भट्टला  गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


इतर महत्वाच्या बातम्या:


National Film Awards 2023:  "मी संजय लीला भन्साळी यांचे आभार मानते"; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती आलिया भट्टनं व्यक्त केला आनंद