Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटची (Alia Bhatt) प्रमुख भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी  या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील आलियाच्या डॅशिंग स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील ढोलिडा गाणं देखील प्रदर्शित झाला होतं आता त्यानंतर  'झूमे रे गोरी' (jhume re gori) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामधील आलियाच्या डान्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


झूमे रे गोरी गाणं रिलीज झाल्यानंतर काही मिनीटांमध्येच या गाण्याला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स करायला सुरूवात केली. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन कृती महेशनं केले आहे. या गाण्याला  
अर्चना गोरे, तरन्नुम मलिक जैन, दिप्ती रेगे, अदिती प्रधुदेसाई या गायकांनी गायले आहे. 






गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे दिग्दर्शन  संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.  आलियासोबत  शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha