Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) कोरोनाची लागण झाली आहे. खिलाडी कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अक्षय कुमाक कान्स चित्रपट महोत्सावात हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अक्षय पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने मी कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. पण कान्स चित्रपट महोत्सावाला माझ्या शुभेच्छा आहेत." ही पोस्ट अक्षयने अनुराग ठाकूरला टॅग केली आहे.
अक्षय कुमारला याआधीदेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अक्षय 'राम सेतु' सिनेमाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवले होते.
अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता, देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं". पृथ्वीराज सिनेमा 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लरदेखील दिसून येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात एआर रहमान, आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि शेखर कपूरसोबत हजेरी लावणार होता. अक्षय कुमार कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नसल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षयचे चाहते त्याला आराम करण्याचा सल्ला देत आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 263 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या