मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चित्रपटांसोबतच त्याच्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. अक्षयचा 'खेल खेल में' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात (Haji Ali Dargah) पोहोचून चादर चढवली आणि प्रार्थना केली. अक्षय कुमारचा आगामी 'खेल खेल में' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. यादरम्यान, त्याने वेळ काढून हाजी अली दर्ग्याला भेट दिली. दरम्यान, अक्षयने काही चांगले काम केले आहे ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.


अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्यावर चढवली चादर


अक्षय कुमारचा मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले होते. आता त्याचा खेल खेल में' चित्रपट 15 ऑगस्टला रिलीझ होणार आहे. त्याचा पुढचा चित्रपट 'खेल खेल में' रिलीज होण्यापूर्वी अक्षय मुंबईतील हाजी अली दर्ग्यात पोहोचला. त्याने दर्ग्यावर चादर चढवली आणि प्रार्थना केली. दर्ग्यात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अक्षयने यावेळी कोट्यवधी रुपयांची देणगीही दिली आहे.






कोट्यवधी रुपये दान करत जिंकली चाहत्यांची मनं


अभिनेता अक्षय कुमार कधीही लोकांना मदत मागे पडत नाही. अनेक वेळी तो गरजवंतांच्या मदतीला उभा राहतो. करोडो रुपयांची देणगी देताना दिसला आहे. दरम्यान, आता या अक्षयने पुन्हा असंच काहीस चाहत्यांचं मन जिंकलं आहे, ज्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


हाजी अली दर्ग्याच्या अधिकृत हँडलनुसार, अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी ट्रस्टला 1.21 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या पोस्टनुसार, अक्षय कुमारने नूतनीकरणाच्या एका भागाची जबाबदारी घेतली, ज्यासाठी 1.21 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अभिनेत्याला 'खरा मुंबईकर' म्हणत ट्रस्टने आभार व्यक्त केले आहेत.






 


अक्षय कुमारने याआधी गरजवंतांसाठी भंडारा आयोजित केला होता. याचा एक व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल झाला होता. अक्षयच्या या व्हिडीओनेही अनेकांची मनं जिंकली आणि त्याच्या चाहत्यांनी त्याचं खूप कौतुक केलं


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : KISS बाई KISS... निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस, अरबाजला जमलं नाही ते घनश्यामनं करुन दाखवलं