Singham 3 Ajay Devgn Injured : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) अभिनीत 'सिंघम 3' (Singham 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात झाला आहे. अजय देवगनला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.


अजय देवगन सध्या 'सिंघम 3' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाचं शूटिंग करत आहे. अजयसह या सिनेमात टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. अजयचे चाहते आणि सिनेप्रेमी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजयचा धमाकेदार अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अशातच आता 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात झाला आहे. त्यामुळे या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. या अपघातात अजयला दुखापत झाली आहे.






अजय देवगनच्या डोळ्याला दुखापत


'सिंघम 3'च्या सेटवर अजय देवगनला दुखापत झाली आहे. अजयच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. अभिनेत्याला दुखापत झाल्याने 'सिंघम 3'चं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. लवकरच हैदराबादमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. 2024 मध्येच या सिनेमाचं शूटिंग होईल. 2023 मध्ये हा सिनेमाचं शूटिंग होणार नाही. अजय देवगन शिवाय 'सिंघम 3'चं शूटिंग पूर्ण होणं अशक्य आहे. तो या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


ल्टीस्टारर 'सिंघम 3'


'सिंघम 3' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. या सिनेमात अजय देवगनसह अक्षय कुमार, करीना कपूर, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि श्वेता तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा बहुचर्चित सिनेमा आहे. याआधी प्रदर्शित झालेला सिंघम आणि सिंघम रिटर्न्स हे सिनेमे प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 'सिंघम 3' या सिनेमात अजय बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'सिंघम 3' या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर धगधगती आग; 'सिंघम 3'मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट