Ajay Devgn Reaction : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2022) चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीत होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgn) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अजयच्या 'तान्हाजी' (Tanhaji) या सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'तान्हाजी'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणं अभिमानास्पद, असे म्हणत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजय देवगणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजय देवगण म्हणाला, "68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे. या पुरस्काराने मला आतापर्यंत तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार 'तान्हाजी' सिनेमासाठी मिळाला आहे". 


अजय देवगण पुढे म्हणाला, 'तान्हाजी' सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणं हे अभिमानास्पद आहे. या सिनेमातील प्रत्येकाचा सिनेमा यशस्वी होण्यात मोलाचा वाटा आहे. सिनेमातील प्रत्येकाचे आभार. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन". 


अजय देवगणला याआधीदेखील मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार


'तान्हाजी' आधी अजय देवगणला 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'जख्म' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच 'द लिजेंड ऑफ भगत' या सिनेमासाठीदेखील अजयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 


'तान्हाजी' सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ओम राऊत आनंद व्यक्त करत म्हणाला,'तान्हाजी' या सिनेमाला दोन पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे. आपल्या सिनेमाला पुरस्कार मिळणं हे खूप अभिमानास्पद आहे. शिवरांच्या मावळ्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता".



संबंधित बातम्या


68th National Film Awards 2022 : लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'तान्हाजी'ला; सर्वोत्कृष्ट अभिनेता अजय देवगण


National Film Awards 2022 Winners List : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या विजेत्यांची यादी