Ajay Devgn Film Maidaan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अजयचे अनेक सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या अजय 'मैदान' (Maidaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अजयच्या या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली असून आता हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


गेल्या काही दिवसांपूर्वी अजयच्या 'दृष्यम 2' या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. आता 'मैदान' सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. 'मैदान' हा सिनेमा भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मॅनेजर सैयद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा सिनेमा 23 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 






17 फेब्रुवारीला 'मैदान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'मैदान' हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी 'मैदान' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अमित रवींद्रनाथ यांचा 'बधाई हो' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


'मैदान' सिनेमागृहात होणार प्रदर्शित


'मैदान' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता हा सिनेमा सिनेमागृहातच प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. झी स्टूडियोजचे निर्माते बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणव जॉय सेनगुप्ताने मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. 


अजयचे आगामी सिनेमे


अजय देवगणचा 'थॅंक गॉड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजयसह सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंहदेखील दिसून येणार आहे. इंद्र कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकला आहे. 'थॅंक गॉड', 'मैदान' सह अजयचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. 


संबंधित बातम्या


'टायगर' पाठोपाठ 'मैदान'लाही तोक्ते चक्रीवादळाचा फटका, चित्रपटाचा सेट उद्ध्वस्त


CAA Protest : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात मुंबईत आंदोलन, फरहान अख्तर-जावेद जाफरी समवेत अनेक सेलिब्रिटींचा समावेश