Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) सध्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडसह साऊथमध्ये ऐश्वर्याने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. 10 पेक्षा अधिक फिल्मफेअर पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळालं आहे. आजच्या घडीला ऐश्वर्या राय बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. अनेक आलिशान घरे आणि गाड्यांसह ती कोट्यवधींची मालकीन आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप दोघांनीही यासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. ऐश्वर्याची दुबईतही कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती अभिषेक बच्चनपेक्षा जास्त आहे. 


ऐश्वर्या रायचं दुबईत एक आलिशान घर आहे. या घराची किंमत 15 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्याचं दुबईतील आलिशान घर जुमेराह गोल्फ इस्टेटमधील सैंक्चुअरी फॉल्समध्ये आहे. ऐश्वर्या राय सर्वात महागडी अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीमध्ये तिचं करिअर यशस्वी झालं आहे.


ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती? (Aishwarya Rai Net Worth)


जीक्यू इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 776 कोटी रुपयांच्या आसपास आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या रायचा समावेश होतो. ऐश्वर्या राय चित्रपटांसह जाहिरातींमधून चांगलेच पैसे कमावते. या जाहिरातींच्या माध्यमातून ती वर्षाला कोट्यवधी रुपये कमावते. ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये आकारते. तर एका जाहिरातीसाठी 6-7 कोटी रुपयांचं मानधन घेते. 


ऐश्वर्या राय अनेक टॉप ब्रँड्ससोबत जोडली गेली आहे. लॉरिअल आणि स्विस अशा मोठ्या ब्रँड्चा ती चेहरा आहे. तसेच लक्स, कोका-कोला, पेप्सी, टायटन, कॅसिओ, फिलिप्स, पामोलिव्ह, कॅडबरी, फूजी फिल्म्स, कल्याण ज्वेलर्ससह अनेक ब्रँडसोबत ऐश्वर्या जोडली गेली आहे.


ऐश्वर्या रायकडे किती बंगले आहेत? 


ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. ऐश्वर्या रायचा दुबईत एक व्हिला आहे. याची किंमत 15 कोटींच्या आसपास आहे. तसेच मुंबईतील बीकेसी भागात तिची एक आलिशान अपार्टमेंट आहे. याची किंमत 20 ते 30 कोटी रुपये आहे. ऐश्वर्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यात रोल्स रॉयस घोस्ट, ऑडी ए 8 एल, मर्सिडीज-बेंज एस 500, मर्सिडीज बेंज एस 350 डी कूप, लेक्सस एलएक्स 570 सह अनेक गाड्यांचा समावेश आहे.


ऐश्वर्याकडे अनेक महागड्या साड्या आणि ज्वेलरी आहेत. 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटात ऐश्वर्या शेवटची झळकली होती. ऐश्वर्या राय वर्षाला 15 कोटी रुपये कमावते. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Bachchan Family : अमिताभ अन् अभिषेकसोबत ऐश्वर्या पोहोचली कबड्डीचा सामना पाहायला; घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम