Paris Fashion Week:  'पेरिस फॅशन वीक' (Paris Fashion Week) चा  L'Oréal पॅरिस फॅशन शो नुकताच पार पडला आहे.  L'Oréal पॅरिस फॅशन शो हा पॅरिस फॅशन वीकचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो  सौंदर्य, कौशल्य आणि फॅशनचा उत्सव आहे. या शोमध्ये अनेकांनी रॅम्प वॉक केला.  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं देखील (Aishwarya Rai) पेरिस फॅशन वीकमध्ये वॉक केला आहे. तसेच ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची भाची आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने देखील 'पॅरिस फॅशन वीक' मध्ये डेब्यू केला. 'पॅरिस फॅशन वीक' मधील नव्या नवेली नंदा आणि ऐश्वर्या यांच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


नव्याची आई श्वेता बच्चननं  'पॅरिस फॅशन वीक'शोमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये श्वेता ही जया बच्चन यांच्यासोबत कार्यक्रम पाहताना आणि नव्याला सपोर्ट करताना दिसत आहेत. श्वेता बच्चननं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नव्या ही आत्मविश्वासाने रॅम्पवर वॉक करताना दिसत आहे. नव्यानं 'पॅरिस फॅशन वीक' या शोसाठी रेड आऊटफिट परिधान केले होते.






ऐश्वर्या राय बच्चननं देखील पॅरिस फॅशन वीक या शोमध्ये वॉक केला. ऐश्वर्याच्या रॅम्प वॉकचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ही गोल्डन कलरचा शिमरी गाउन आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे.






ऐश्वर्या आणि नव्या यांच्या व्यतिरिक्त या फॅशन शोमध्ये केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, अँडी मॅकडोवेल, हेलन मिरेन, अजा नाओमी किंग, व्हायोला डेव्हिस यांसारख्या इतर सेलिब्रिटींचा समावेश होता.


नव्यानं काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.नव्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Cannes 2023: ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'चिकन शोरमा ..'