Abhishek Bachchan Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे बॉलिवूडच्या चर्चित कपल्सपैकी एक आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची कायम चर्चा असते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या व्हायरल होत असतात. या कपलच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा अनेकदा समोर येतात. आता मात्र, अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ऐश्वर्या-अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक एअरपोर्टवर एकत्र दिसले. त्यांच्यासोबत लेक आराध्याही दिसली. तिघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून यांच्या नात्यात सर्व काही आलबेल असल्याचं समोर आलं आहे.


ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्रच 


ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात सर्व काही ठीक आहे, त्यांचा घटस्फोट झालेला नाही, हे या जोडप्याने एकत्र येऊन सर्व जगाला सांगितलं आहे. अखेर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबई विमानतळावर दिसले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र नवीन वर्ष साजरे करून मुंबईत परतले आहेत. 4 जानेवारीला सकाळी दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. यावेळी तिघेही कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा शांत झाल्या आहेत. हे दोघेही एकत्र असल्याचं व्हिडीओवरुन स्पष्ट दिसत आहे.


न्यू एयर पार्टीनंतर अभिषेक-ऐश्वर्या एकत्र स्पॉट






VIDEO मुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम


मुंबई एअरपोर्टवर ऐश्वर्या राय फूल ब्लॅक आऊटफिटमध्ये फारच सुंदर दिसत होती, तर अभिषेक बच्चन ग्रे हुडी आणि ब्लॅक ट्रॅक पँट अशा कूल लूकमध्ये हँडसम दिसत होता. यावेळी आराध्या बच्चन आनंदाने उड्या मारताना दिसली. ऐश्वर्या आणि अभिषेकने पापाराझींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. यावरुन या कपलमध्ये सर्व काही आलबेल आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! रवींद्र नाट्य मंदिरात फेब्रुवारी अखेरीस तिसरी घंटा