Ravindra Natya Mandir : नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नुतनीकरणासाठी बंद असलेल्या रवींद्र नाट्य मंदिर फ्रेबुवारी अखेर सुरु होण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रवींद्र नाट्यमंदिर फेब्रुवारीअखेर खुले करण्याचा निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशीष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. 'रवींद्र नाट्यमंदिर नाटक, चित्रपट, कलावंत आणि प्रेक्षकांसाठी फेब्रुवारीअखेरपर्यंत खुले करून देता येईल यादृष्टीने कामाचे नियोजन करा. पु. ल. देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश आशीष शेलार यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रवींद्र नाट्यमंदिर फेब्रुवारीअखेर खुले करण्याचे निर्देश
राज्य सरकारच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी पु. ल. देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. हे नूतनीकरण करत असताना कलावंत आणि प्रेक्षकांना अद्ययावत सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. डॉल्बी साऊंड सिस्टिम, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुसज्ज अशा मेकअप रूमसह मुख्य व मिनी थिएटर कला सादरीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कलादालन आणि इतर दालनेसुद्धा अत्यंत देखण्या स्वरूपात उभारली जात आहेत, तर बाहेर छोटे खुले नाट्यगृह तयार करण्यात येत आहे.
पु. ल. देशपांडे अकादमीच्या वास्तूचं नुतनीकरण
पु. ल. देशपांडे अकादमीच्या वास्तूला नुतनीकरणातून मराठी साज चढवण्यात येत आहे. मराठी कलासंस्कृती आणि नाट्यपंरपरेचा वारसा विचारात घेऊन त्यानुसार या वास्तूची सजावट करण्यात येत आहे. मंत्री आशीष शेलार यांनी या नुतनीकरणाच्या कामाची संपूर्ण कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि सबंधित अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. पु. ल. देशपांडे अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यावेळी उपस्थित होत्या.
नुतनीकरणाच्या कामाचे नियोजन अन् निर्देश
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशीष शेलार यांनी पु.ल. देशपांडे अकादमीच्या कामाची पाहणी केल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे अकादमी नुतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नाट्य, सिनेकलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करुन देता येईल, या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले."
महत्त्वाच्या इतर बातम्या :