बंगळुरु : देश-विदेशात आज सुपरस्टार रजनीकांतच्या कबाली सिनेमाचा फिव्हर आहे.  रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला कबाली चित्रपट आज बॉक्सऑफिसवर धडकतोय. दक्षिण भारतासह पूर्ण देशभरात आणि परदेशात कबाली चित्रपटाची चर्चा आहे. इतकंच नाही तर चेन्नई, बंगळुरुत "कबाली'च्या मुहुर्तावर कर्मचाऱ्यांचा मास बंक टाळण्यासाठी कंपनीकडून थेट सुट्टीच जाहीर करण्यात आली आहे.


 

तिकडे बंगळुरुमध्ये कबाली सिनेमा पाहण्यासाठी एअर एशियाने विशेष विमानसफारीचं आयोजन केलं आहे. चाहत्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता यावा, यासाठी एअर एशियाने खास ऑफर दिली आहे. हे विमान बंगळुरुतून उड्डाण घेऊन चेन्नईला उतरणार आहे.

 

उडता रजनी, ‘एअर एशिया’च्या विमानावर रजनीकांत


 

एअर एशियाने यासाठी खास विमान तयार केलं आहे.  या विमानाचं तिकीट 7,860 रुपये असेल. यामध्ये विमान तिकिटाशिवाय कबाली सिनेमाचं तिकीट, ऑडिओ सीडी, नाश्ता, जेवण, स्नॅक्स यांचा समावेश असेल.

 

सुपरस्टार रजनीकांतचे पोश्टर लावून हे विमान सजवण्यात आलं आहे. तसेच प्रवाशांना कबाली पाहण्याचा जबरदस्त अनुभव मिळावा यासाठी या विमानात खास सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या अनोख्या प्रवासासाठी रजनीकांतचे चाहते खूपच उत्सुक होते.

 

मुंबईत पहाटे पाचचा शो हाऊसफुल्ल

 

मुंबईतही अरोरा थिएटरमध्ये सकाळी 5 वाजता रजनीकांतच्या फोटोला दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहिला शो सुरु झाला. पुढे काही दिवस अरोरा थिएटरमधील कबालीचे सगळे शो हाऊसफुल्ल असल्याचंही सांगण्यात येत आहे.

 

कबालीमध्ये रजनीकांतसोबत मराठमोळी राधिका अपटेही मुख्य भूमिकेत आहे.

संबंधित बातम्या


मुंबईतही कबालीचा फिव्हर, पहाटे 5 चा शो हाऊसफुल्ल


‘कबाली’ची ऑनलाइन कॉपी लिक झाली नसल्याचा निर्मात्यांचा दावा


चेन्नई, बंगळुरुत ‘कबाली’साठी कंपन्यांकडून सुट्टी जाहीर !


रजनीच्या हृदयात राधिका, ‘कबाली’चं पोस्टर रिलीज


व्हॉट्सअॅपवरील रजनीकांत यांच्या ‘कबाली’च्या ‘इमोजीचं व्हायरल सत्य


घरात टॉयलेट बांधा, ‘कबाली’चं तिकीट मोफत मिळवा


‘एअर एशिया’चं रजनीप्रेम, विमानावर थलैवाचा फोटो


इरफान म्हणतो, रजनीकांतने पोस्टरची कल्पना चोरली, पण..


रजनी फिव्हर…. ‘कबाली’ची रिलीज आधीच 200 कोटींची कमाई!