Aggabai Sasubai : 'अग्गंबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेचा लवकरच 'कन्नड' भाषेत रिमेक होणार आहे. याआधी या मालिकेचे तामिळ आणि मल्याळम भाषेतदेखील रिमेक झाले होते. निवेदिता सराफ, डॉ. गिरिश ओक आणि तेजश्री प्रधान 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत मुख्य भूमिकेत होते. 


'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर 'अग्गंबाई सूनबाई' नावाची मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेचा दुसरा भाग होती. या मालिकेत नात्यांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आले होते. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील 'बबड्या' हे पात्र प्रचंड गाजले होते. 


'देवमाणूस' मालिकेचा कन्नड भाषेत होणार रिमेक
'अग्गंबाई सासूबाई' मालिकेप्रमाणेच 'देवमाणूस' मालिकेच्या पहिल्या भागाचादेखील लवकरच कन्नड भाषेत रिमेक होणार आहे. 'देवमाणूस' मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सध्या या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. मालिकेतील सर्वत्र पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. 


'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवलं.  या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.


संबंधित बातम्या


शाहरुख खान गौरीसाठी 5 वर्षे हिंदू म्हणून जगला, अशी आहे दोघांची प्रेम कहाणी 


Lata Mangeshkar Last Song : लता मंगेशकर यांचे शेवटचे गाणे ऐकून चाहते भावूक


Salman Khan : सलमान खान ईदच्या दिवशी करणार धमाका, 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha