Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) वांद्रे (Bandra) बँडस्टँड येथील मन्नत (Mannat) या बंगल्यामध्ये दोन तरुण अवैध पद्धतीनं घुसले होते. या प्रकरणी गेल्या आठवड्यात दोन व्यक्तींना मुंबई (Mumbai) पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही आरोपी शाहरुख खानला भेटण्यासाठी मन्नत या बंगल्यात गुपचूप घुसले आणि सुमारे आठ तास शाहरुख खानची मेकअप रूममध्ये वाट पाहत बसले होते. दोघांना कोर्टातून 10 हजार रुपयांवर जामीन मिळाला. आता मुंबई पोलिसांनी शाहरुखला त्याच्या मन्नत या बंगल्याचे सिक्युरिटी ऑडिट करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. 


शाहरुखचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते मन्नत (Mannat) या त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करतात. पण दोन तरुण मात्र शाहरुखला भेटण्यासाठी मन्नतमध्ये अवैध पद्धतीनं घुसले होते. या प्रकरणाची चर्चा सुरु होती. हे प्रकरण झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला त्याच्या मन्नत या बंगल्याचे सिक्युरिटी ऑडिट करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. 


"शाहरुखच्या बंगल्यामध्ये दोन चाहत्यांनी घुसखोरी केल्याची घटना घडल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याच्या निवासस्थानाचे सिक्युरिटी ऑडिट करण्यास सांगितले. बंगल्यामधील कोणत्या गोष्टी हरवल्या आहेत का? याची तपासणी देखील या ऑडिटमध्ये केली जाणार आहे.  सुरक्षेची  खबरदारी घेण्यासाठी हे ऑडिट करण्यास सांगितलं आहे." अशी माहिती एका सूत्रानं इ टाइम्स या संकेतस्थळाला दिली आहे.


वांद्रे (Bandra) पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मन्नतमध्ये गुपचूप घुसलेल्या दोन तरुणांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली, त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी येऊन त्यांना जामीन मिळवून दिला. दोघांना कोर्टातून 10 हजार रुपयांवर जामीन मिळाला.


शाहरुख खानचे चित्रपट


शाहरुखचा पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. लवकरच शाहरुखचा जवान आणि डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Shah Rukh Khan: शाहरुखचे चाहते मेकअप रुममध्ये आठ तास लपले होते; मन्नत बंगल्याच्या मॅनेजरची माहिती