जॅकलिनची याआधी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली होती. दरम्यान विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतरिम जामिनावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता.
सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला दिल्या होत्या महागड्या वस्तू
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचंनाव समोर आले होते. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले.
जॅकलिन फर्नांडिला सुकेश चंद्रशेखरनं महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती. तर प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली 36 लाख रूपयांची 4 पर्शियन मांजरं देखील जॅकलिनला देण्यात आली होती. दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा सुकेशवर आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते.
जॅकलीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तिचा 'रामसेतू' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमात जॅकलीनसोबत नुसरत भरुचा आणि अक्षय कुमार यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: