Sara Ali Khan on Politics: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हीने लोकसभेचं (Lok Sabha Election 2024) तिकीट मिळवतच राजकारणात प्रवेश केला. भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या यादीत कंगनाला उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. पण कंगनासोबतच आता आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री तिच्या राजकारणातील एन्ट्रीसाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही राजकारणात एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना अभिनेत्री स्वत:याबाबत भाष्य केलं आहे. 


सारा अली खान हिचं शिक्षण देखील पॉलिटिकल सायन्समधून झालं आहे. त्यामुळे सारा भविष्यात नक्कीच राजकारणात एन्ट्री करु शकते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. दरम्यान साराने तिच्या राजकारणाच्या एन्ट्रीवर भाष्य केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या देखील प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


सारानं काय म्हटलं?


साराने नेटफ्लिक्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी साराला तुला भविष्यात राजकारणात यायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सारानं म्हटलं की, 'होय मी भविष्यात राजकारणात येण्याचा विचार करतेय.' दरम्यान ही पहिलीच वेळ नाही की साराने तिच्या राजकारणातील चर्चांवर भाष्य केलं आहे. साराचा 2019 मध्येही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिनं म्हटलं होतं की, 'हा तिच्यासाठी बॅकअप ऑप्शन नाही. जोपर्यंत मला इंडस्ट्रीत काम मिळतंय तोपर्यंत मी इथेच राहिन. पण वेळ आल्यावर मी राजकारणात जाण्याचा नक्कीच विचार करेन.' 


साराच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, आता हे लोकं कोणतंही क्षेत्र सोडणार नाही. दरम्यान सारा ही नुकतीच ओटीटीवर रिलीज झालेल्या 'मर्डर मुबारक' आणि 'ऐ वतन मेरे वतन' या चित्रपटांमध्ये झळकली होती. 






ही बातमी वाचा : 


OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या आठवड्यात ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट येणार, पाहा यादी