बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने टीम इंडियाचे कौतुक केले आहे. आमिर खानने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये आमिरने म्हटले आहे की, "विराट आज नशीब आपल्या सोबत नव्हतं. आजचा दिवस आपला नव्हता. ज्या दिवशी भारताने स्वतःसाठी सेमीफायनलची दारं उघडली तसेच गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले, माझ्यासाठी या टीमने तेव्हाच वर्ल्डकप जिंकला होता. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही खूप चांगले खेळलात. काल जर पाऊस पडला नसता, तर आजचं चित्र वेगळं असतं. तुम्ही शानदार प्रदर्शन केले. मला तुमच्यावर गर्व आहे."
आमिर नंतर अभिनेते बोमन इराणी, अभिनेत्री इशा गुप्ता आणि रणदीप हुड्डा यांनीदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील टीम इंडियाला पाठिंबा दर्शवला आहे