Animal Movie: अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) हा सध्या त्याच्या अॅनिमल (Animal) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अॅनिमल चित्रपटामध्ये बॉबीनं साकारलेल्या  अबरार या भूमिकेचं अनेकजण कौतुक करत आहेत. अॅनिमल या चित्रपटात अबरारला बोलता येत नसते. पण या चित्रपटात एकही वाक्य न बोलता केवळ अभिनयाच्या जोरावर बॉबीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता अॅनिमल या चित्रपटानंतर बॉबीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉबीनं त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. 


'या' आगामी चित्रपटात बॉबी करणार काम (Bobby Deol Upcoming Movie)


साऊथ स्टार सुर्याच्या 'कांगुवा' (Kanguva) या चित्रपटात बॉबी काम करणार आहे. एका मुलाखतीमध्ये बॉबीनं या चित्रपटाबद्दल सांगितलं,  "होय, मी सुर्यासोबत कांगुवा या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाची टीम अप्रतिम आहे, शिवा हा स्विटहार्ट आहे आणि सुर्या हा एक अप्रतिम अभिनेता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खरा आनंद होतो."


'कांगुवा' मधील भूमिकेबाबत काय म्हणाला बॉबी?


'कांगुवा' चित्रपटामधील भूमिकेबाबत बॉबी म्हणाला, "ही भूमिका नक्कीच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची आहे, मला ही भाषाही येत नाही, त्यामुळे ती पुन्हा माझ्या झोनच्या बाहेरचे काम करत आहे. मी एक-दोन महिन्यात तमिळ शिकू शकत नाही, पण मी त्यावर नक्कीच काम करेन." आता कांगुवा या चित्रपटामधील बॉबीचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 


'कांगुवा' ची स्टार कास्ट


योगी बाबू, जगपती बाबू, कोवई सरला, आनंद राज आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हे कलाकार देखील कांगुवा या चित्रपटात काम करणार आहेत.  सिरुथाई शिवा दिग्दर्शित कांगुवा या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.   हा चित्रपट 3D मध्ये रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी सूर्यानं कांगुवा या चित्रपटाचा टायटल लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. यामधील सूर्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Suriya Kanguva: दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट; 'कंगुवा' चित्रपटामधील अभिनेत्याची झलक पाहून अंगावर येतील शहारे!