Adipurush Twitter Review:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) यांचा 'आदिपुरुष' (Adipurush) हा  चित्रपट  आज (16 जून) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.  प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली. अनेक जण या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आदिपुरुष चित्रपट नेटकऱ्यांना कसा वाटला? याबद्दल जाणून घेऊयात...


एका नेटकऱ्यानं आदिपुरुष चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,  'आदिपुरुष हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपट बघताना अंगावर शहारे येतात. चित्रपटाचं बीजीएम खूप चांगलं आहे. प्रभासनं चांगला अभिनय केला आहे. बाकीची कास्टिंग देखील चांगली आहे. चित्रपटातील वीएफएक्स चांगलं नाहीये.'


तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'आदिपुरुष हा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटातील 3D इफेक्ट्स छान आहेत. प्रभास आणि क्रिती सेनन यांनी उत्तम काम केले आहे. चित्रपटातील गाणी खूप छान आहेत. क्लायमॅक्स सीन दरम्यान VFX खराब आहे. मोठ्या पडद्यावरच हा चित्रपट पाहावा.'










अनेक नेटकरी आदिपुरुष चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाला 'ब्लॉकबस्टर' म्हणत आहेत. 


अदिपुरुष चित्रपटाची स्टार कास्ट






आदिपुरुष या चित्रपटामध्ये  प्रभासनं श्री रामाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री कृती सेनननं सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष' हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Adipurush Movie Released : ढोल-ताशांचा गजर, शाळेतील मुलांसाठी स्पेशल शो; 'आदिपुरुष'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल; 6,200 स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित!