Adipurush Movie Released : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा बहुचर्चित सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच एक लाखापेक्षा अधिक तिकीटांची विक्री केली आहे.
6,200 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार 'आदिपुरुष'
'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तब्बल 6,200 स्क्रीन्सवर 2 डी आणि 3 डीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे. जगभरातील सिनेप्रेमी आता हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. फर्स्ट डे फर्स्ट अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्ल आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'आदिपुरुष' सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. ढोल-ताशांचा गजरात चाहते 'आदिपुरुष' सिनेमाचं स्वागत करत आहेत. अनेक ठिकाणी शाळेतल्या मुलांना 'आदिपुरुष' सिनेमा दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका हनुमानाची मूर्ती घेऊन सिनेमागृहात एन्ट्री करत असून नंतर ती एका खूर्चीवर ती मूर्ती ठेवत आहे. एका सिनेमागृहात तर 'आदिपुरुष'च्या प्रदर्शनादरम्यान माकडानेच एन्ट्री घेतली आहे. एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे,"आदिपुरुषच्या भव्य प्रकाशनासाठी हनुमानजी स्वत: आले आणि आशीर्वाद दिला आहे".
'आदिपुरुष' या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पण वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित पौराणिक सिनेमा आहे. मराठमोळा ओम राऊतने (Om Raut) या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास (Prabhas) रामाच्या आणि कृती सेनन (Kriti Sanon) सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या, सनी सिंह लक्ष्मणाच्या आणि मराठमोळा देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सोनल चौहान आणि तृप्ती तोरदमलदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या