Adipurush : 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमावर वेगवेगळ्या कारणाने टीका होत आहे. मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध होत आहे. आता ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (All Indian Cine Workers Association) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहित सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.'हे आमचं रामायण नाही', असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. 


ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने 'आदिपुरुष' सिनेमावर बंदी घालण्याची केली मागणी


ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित 'आदिपुरुष' सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होता कामा नये असेही आदेश दिले आहेत. असोसिएशनने 'आदिपुरुष' सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत, संवादलेखक मनोज मुंतशीर आणि यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. 






ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने लिहिलेल्या पत्रात काय आहे?


'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने 'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सिनेमाचं कथानक, पटकथा आणि संवाद हे राम आणि हनुमान यांच्या प्रतिमेची स्पष्टपणे बदनामी करत आहेत. 'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदू आणि सनातनी धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे".  


भारतीयांसाठी प्रभू राम हे देव आहेत. या सिनेमातला रावण हा एखाद्या खेळातल्या राक्षसासारखा वाटतो. 'आदिपुरुष' सिनेमातील संवादांनी देशातील आणि जगभरातील प्रत्येक भारतीयाला दुखावलं आहे. आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात या सिनेमाच्या ओटीटी रिलीजवरदेखील बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 


'आदिपुरुष' सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut), लेखक मनोज मुंतशीर शुक्ला (Manoj Muntasir) आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मंडळींनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. 'आदिपुरुष' सिनेमात प्रभास, कृती सेनन  आणि सैफ अली खान अशा लज्जास्पद सिनेमाचा भाग नसायला हवे होते. 'आदिपुरुष' हा राम आणि रामायणावरील श्रद्धेचा भाग असायला हवा. 


संबंधित बातम्या


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती