Rocky Aur Rani Ki Prem Kahani New Poster Out : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर आणि आलियाप्रमाणे करण जौहरदेखील (Karan Johar) या सिनेमासाठी उत्सुक आहेत. 


करण जौहरने नुकतचं सोशल मीडियावर आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा लूक पाहण्याजोगा आहे. त्यांच्या या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तर रणवीरदेखील लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. 






'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर 20 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर शेअर करत करण जौहरने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 28 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टर शेअर करत करणने लिहिलं आहे,"प्रेमाची सुरुवात झाली आहे... 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे. तर 28 जुलैला सिनेमा रिलीज होईल".


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. करण जौहरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळेच तो या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. करणने शेअर केलेल्या पोस्टरवर चाहतेदेखील या सिनेमाची प्रतीक्षा करत असल्याचं सांगत आहेत.  नव्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा, आता फक्त 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची प्रतीक्षा". 


संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani:'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची रिलीज डेट जाहीर; आलिया आणि रणवीरच्या लूकनं वेधलं लक्ष